कोरोना व्हायरसवरून मागील काही दिवसांमध्ये अमेरिका आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभुमीवर आता अमेरिकेचे काँग्रेसमन टेड योहो यांनी चीनवर बंदी घालून उद्योग भारतात हलवण्यात यावे अशी मागणी केली आहे. जेणेकरून जगात चीनशिवाय देखील एक पर्याय निर्माण होईल. टेड योहो यांनी इंडिया टुडेशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
चीनवर बंदी घालून भारतात स्थलांतरित करा उद्योगधंदे, अमेरिकन खासदाराची मागणी

योहो म्हणाले की, अमेरिकेची निति ही आहे की आपल्या सारखी मानसिकता असणाऱ्या देशांना सोबत ठेवावे. चीनमधून उद्योग हटवून भारतात स्थापन करण्यासाठी अमेरिका योजना देखील बनवत आहे. सोबतच ज्यांना अमेरिकेला परतायचे आहे, ते परतू शकतात. जगाला पीपीई किटची गरज असताना, चीनने देणे टाळले. यानंतर आम्ही राजदुतांशी चर्चा केली की चीनमधून या क्षेत्राला हलवून भारतात नेण्यात यावे.

ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी मेक इन इंडिया अभियान चालवत आहेत. अशा स्थितीत उद्योग चीनमधून भारतात आले तर मोठी गुंतवणूक होईल. असे केल्याने चीनवर आर्थिक दबाव निर्माण होईल व ते निर्यात साखळीपासून दूर होतील. जगाने चीनसोबत संबंध तोडायला हवे. कारण चीन जे आपल्या लोकांसाठी बोलतो ते देशांतर्गत व देशाबाहेर देखील लागू करत नाही. केवळ चीनला जगाची फॅक्टरी म्हणावे अशी अमेरिकेची इच्छा नाही. त्यांना देखील विकासशील देशांची सुविधा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळू नये. चीनने संरक्षण बजेट 6.9 टक्के का वाढवले ? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

अमेरिका चीनवर कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. जेणेकरून तायवान, हाँगकाँग, दक्षिण चीन समुद्र आणि जागतिक आरोग्य संघटनेला चुकीचा रिपोर्ट देण्याची शिक्षा मिळेल.