टेस्लाचे सीईओ आणि टेक अब्जाधीश एलॉन मस्क हे कंपनीतून एकही रुपया पगार घेत नाही. मात्र असे असले तरी देखील त्यांनी कोट्यावधींची कमाई केली. मस्क यांना टेस्ला अथवा स्पेस एक्स कंपनीच्या कामगिरीच्या आधारावर इन्सेंटिव्ह मिळत असतो. अशाच प्रकारचे पहिले पेआउट मस्क यांना मिळाले असून, त्यांनी तब्बल 775 मिलियन डॉलर्सची (जवळपास 5860 कोटी रुपये) कमाई केली आहे. मस्क यांना पहिले इन्सेंटिव्ह पेआउट देण्यात आले असून यात टेस्लाचे 1.7 मिलियन शेअर आहे. सध्याच्या मार्केटनुसार या शेअर्सची किंमत 775 मिलियन डॉलर आहे.
एकही रुपया पगार न घेता ‘एलॉन मस्क’ यांनी केली 5,860 कोटींची कमाई
मस्क यांना देण्यात आलेल्या प्रत्येक शेअर्सची किंमत प्रत्येकी 350.02 डॉलर असून, पुढील 5 वर्ष या शेअर्सचा होल्डिंग पिरियड असेल. टेस्ला कंपनीचे बाजार मुल्य 100 बिलियन डॉलर्सवर पोहचल्याने मस्क यांना हे पेआउट देण्यात आले आहे.

2012 मध्ये टेस्ला कंपनीचे बाजार मुल्य केवळ 4 बिलियन डॉलर होते. मात्र आता हा आकडा 100 बिलियन डॉलर्सवर पोहचले आहे. 2020 मध्ये टेस्लाचे स्टॉक वॅल्यू झपाट्याने वाढली आहे. जर वर्ष 2028 पर्यंत टेस्लाचे बाजार मुल्य 650 बिलियन डॉलर एवढे वाढल्यास मस्क तब्बल 50 बिलियन डॉलर्सची कमाई करू शकतात.