‘मिनियन्स’ आणि ‘ग्रू’ ने आपल्या खास शैलीत केले नागरिकांना कोरोनाबाबत जागरुक

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वारंवार हात धुवणे, सोशल डिस्टेंसिंगचा पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. लोकांमध्ये जागृकता पसरवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न देखील केला जात आहे. असाच काहीसा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेने ‘डेस्पिकेबल मी’ या चित्रपटातील लोकप्रिय पात्र ग्रू आणि मिनियन्स यांच्याद्वारे केला आहे.

डेस्पिकेबल मी या चित्रपटाची निर्मिती करणारा स्टुडिओ इलुमिनेशनने जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रासोबत मिळून एक खास व्हिडीओ तयार करत लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हिडीओमध्ये ग्रू या पात्राला अभिनेता स्टिव्ह कॅरेलने आवाज दिला असून, स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगिज आणि अरेबिक अशा अनेक भाषांमध्ये याला भाषांतर करण्यात आलेले आहे. एक मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये ग्रू लोकांना वारंवार हात धुण्यास व सोशल डिस्टेंसिंग पाळण्यास सांगत आहे. तसेच घरात डान्स, नवीन पदार्थ बनविण्याचा आनंद घ्या व इतरांशी प्रेमळपणे वागा असे सांगत आहे.

Leave a Comment