भारताविरुद्ध गरळ ओकणारा माजी मलेशियन पंतप्रधान अडचणीत, पक्षाने केली ही कारवाई

मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांना संसदीय सत्रात विरोधी पक्षांसोबत बैठक केल्याने त्यांच्या पक्षाने हकालपट्टी केली आहे. ते स्वतः यूनायटेड इंडेजिनस पार्टी ऑफ मलेशिया पक्षाचे सह-संस्थापक आहेत. महातिर हे काश्मिर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भारतावर टीका केल्याने चर्चेत आले होते.

Image Credited – Aajtak

महातिर यांनी मागील वर्षी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आपल्या भाषणात भारताने बळाचा वापर करून काश्मिरवर कब्जा केला असल्याचा वापर केला होता. यावरून भारताने मलेशियावरून खाद्य तेलाच्या आयातीवर निर्बंध लादले होते.

Image Credited – Aajtak

यूनायडेट इंडेजिनस पार्टी ऑफ मलेशियाने म्हटले की महातिर यांचे पक्ष सदस्यत्व त्वरित रद्द केले जात आहे. महातिर यांनी मोहिउद्दीन यासीन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा न दिल्याने त्यांची पक्षाने हकालपट्टी करण्यात आली. मलेशियात मार्च महिन्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर महातिर यांच्या जागी यासीन हे पंतप्रधान झाले होते. मागील आठवड्यात महातिर यांनी विरोधी पक्षांसह बैठक करत पंतप्रधान यासीन यांचे नेतृत्व सार्वजनिकरित्या नाकारले होते.

Image Credited – Aajtak

फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याआधी 94 वर्षीय महातिर हे जगातील सर्वात वृद्ध पंतप्रधान होते. राजीनामा दिल्यानंतर इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन सत्ते येणार होते, मात्र मोहिउद्दीन यांनी सरकार स्थापन केले.

Leave a Comment