गुगलचा इशारा! ‘WHO’ च्या नावे हॅकर्स करत आहे तुमची फसवणूक

कोरोना व्हायरस संकटाच्या काळात भारतात हॅकिंगचे प्रमाण देखील वाढले असल्याचे समोर आले आहे. भारतातील काही कंपन्या जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाखाली बनावट ईमेल बनवून आरोग्य संस्था, व्यक्ती आणि कंसल्टिंग सर्व्हिसची खाजगी व आर्थिक माहिती चोरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे गुगलला आढळले आहे.

गुगलच्या रिपोर्टनुसार, भारतात एप्रिल महिन्यात सरकारचा पाठिंबा असणारे हॅकर्सने 50 ते 100 युजर्सला टार्गेट केले आहे. भारतातून अमेरिका, स्लोवेनिया, कॅनडा, बहरिन, सायप्रस आणि ब्रिटनमधील लोकांना देखील टार्गेट केले जात आहे.

Image Credited – Search Engine Land

गुगलनुसार, हॅकर कोरोनासंबंधित माहिती मिळवण्यासाठी युजर्सला डायरेक्ट लिंक पाठवून साइन अप करण्यास सांगतात. ही लिंक डब्ल्यूएचओची आहे असे भासवतात. युजरने लॉग इन केल्यावर हॅकर्सला खाजगी माहिती, फोन नंबर अशी माहिती मिळते. कंपनीने जगभरातील युजर्सला हॅकिंगबाबत 1,755 वेळा मेसेज पाठवून सावध केले आहे. अनेक युट्यूब चॅनेल देखील हटवण्यात आले आहेत.

Image Credited – Forbes

कंपनीच्या थ्रेट एनालिटिक ग्रुपने 50 देशातील 270 ग्रुप्सला ट्रॅक केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. या ग्रुप्सचा उद्देश बौद्धिक मालमत्ता जप्त करणे, सामजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करणे, सायबर हल्ला आणि चुकीची माहिती पसरवणे हा असतो.

Leave a Comment