एक्स बॉयफ्रेंडचे नेटफ्लिक्स अकाउंट वापरण्यासाठी मुलीने वापरली भन्नाट कल्पना, नेटिझन्स झाले प्रभावित

एका मुलीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडचे नेटफ्लिक्स अकाउंट वापरण्यासाठी वापरलेल्या भन्नाट कल्पनेने नेटिझन्स खूपच प्रभावित झाले आहेत. स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सवर आपल्या ओळखीच्या लोकांना आपण अनेकदा अकाउंट शेअर करत असतो. मात्र काहीजण विशेष ट्रिक्स वापरून, हॅक करून स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत असतात. मात्र एका मुलीने नेटफ्लिक्स अकाउंट वापरण्यासाठी जे केले, त्याने स्वतः नेटफ्लिक्स देखील प्रभावित झाले आहे.

ट्विटर युजर @yellowgengar2 ने आपल्या नेटफ्लिक्स अकाउंटच्या होमपेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्याने लिहिले की, माझ्या भावाची एक्स गर्लफ्रेंड मागील दोन महिन्यांपासून सेटिंग्स हे नाव वापरून नेटफ्लिक्स अकाउंट वापरत आहे. मला तिच्याबद्दल काहीच राग नाही. उलट या अकाउंटला नेटफ्लिक्सची खरोखर सेटिंग्स समजल्याने स्वतः वरच नाराज आहे.

थोडक्यात, मुलीने आपल्या नावाच्या जागी प्रोफाईलचे नाव सेटिंग्स ठेवले व लोडिंगचे चिन्ह वापरले. दोन महिने दुसऱ्यांना देखील ते अकाउंट नेटफ्लिक्सची सेटिंग्स आहे असेच वाटत होते.

सोशल मीडियावर हे ट्विट व्हायरल झाले असून, आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक जणांनी लाईक्स केले आहे. मुलीने नेटफ्लिक्स पाहण्यासाठी वापरलेल्या भन्नाट कल्पनेने नेटिझन्स देखील चांगलेच प्रभावित झाले. स्वतः नेटफ्लिक्सने ट्विटर अकाउंटवरून यावर प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment