भारत-चीनमधील सीमा वाद हा 6 दशक जुना आहे. भारताने चर्चेने हा वाद सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे, मात्र चीनकडून असा प्रयत्न होताना दिसत नाही. लद्दाख, अक्साई चीन, तिबेट, डोकलाम आणि सिक्कीम भागात चीन नेहमीच खुरापती काढत असते. मात्र केवळ सीमाच नाही तर, भारत-चीन विवादाची आणखीही काही कारणे आहेत.
केवळ सीमाप्रश्नच नव्हे तर, भारत-चीन वादामध्ये ही आहेत 8 कारणे

तिबेट –
भारत-चीनमध्ये तिबेट राजकीय, भौगोलिक मध्यस्थ म्हणून काम करते. भारताने तिबेटला मान्यता दिली असली तरी तिबेट शरणार्थींवरून चीन वारंवार खुरापती करत असतो.

अक्साई चिन –
लद्दाख भागात अक्साई चिन रस्ते बनवून चीन निर्माण कार्य करत आहे. यामुळे देखील दोन्ही देशात तणाव आहे. चीन पाक व्याप्त काश्मिरला पाकिस्तानचा भाग मानते. मात्र भारतातील काश्मिरला भारताचा भाग मानण्यास तयार नाही. हे देखील वादाचे मोठे कारण आहे.

3488 किमी सीमा –
दोन्ही देशांमध्ये जवळपास 3488 किमीची सीमा आहे, मात्र यात कोणतीही सुस्पष्टता नाही. चीन या वादाचा वारंवार भारतावर दबाव बनविण्यासाठी वापर करतो.

अरुणाचल प्रदेश –
चीन संपुर्ण अरूणाचल प्रदेशावर दावा करत आला आहे. अरुणाचलमध्ये जलविद्युत योजनेसाठी आशिया विकास बँकेकडून कर्ज घेण्यासाठी चीनने विरोध केला होता. चीन येथील नागरिकांना खास व्हिसा देखील देते. जेणेकरून येथील लोकांना चीनमध्ये जाता येईल.

ब्रह्मपुत्र नदी –
चीन ब्रह्मपुत्र नदीवर अनेक धरणे बांधत आहे. चीनला कालव्यांद्वारे नदीचे पाणी उत्तर चीनमधील भागात न्यायचे आहे. हे देखील दोन्ही देशांमधील वादाचे कारण आहे.

हिंद महासागर –
चीनने मागील काही वर्षात हिंद महासागरात आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका आणि मालदीवसह भागीदारी करून भारताला वेढण्याचे काम करत आहे.

पीओकेमध्ये चीनचे काम –
पाकव्याप्त काश्मिर आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये चीन अनेक विकास कामे करत आहे. धरण, रस्ते बांधण्याचे काम चीन याव भागात करत आहे. चीनचे हजारो सैनिक येथे आहेत.

दक्षिण चीन सागर –
दक्षिण चीन सागरात चीनला प्रभुत्व मिळवायचे आहे. जेणेकरून उर्जेची आपुर्ती करता येईल. यावरून व्हिएतनाम, जपान आणि फिलिपाईन्स देशांसोबत चीनचा वाद सुरू आहे. काही वर्षांपुर्वी व्हिएतनामच्या दोन तेल ब्लॉक योजनेत काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांना देखील दक्षिण चीन सागरातून लांब राहण्याचा इशारा चीनने दिला होता.