सर्वात मोठ्या ड्रग माफियाच्या भावाचा आयफोन हॅक, अ‍ॅपल विरोधात कोट्यावधींचा खटला

जगातील सर्वात मोठा ड्रग तस्कर पाब्लो एस्कोबारच्या भावाने अ‍ॅपल कंपनी विरोधात 2.6 बिलियन डॉलर्सचा (जवळपास 19,659 कोटी रुपये) खटला दाखल केला आहे. पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबार म्हणाला की त्याचा आयफोन हॅक करण्यात आला व त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या पत्र आल्यानंतर त्याने कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. रॉबर्टोचा फोन हॅक केल्यानंतर फेसटाईमद्वारे त्याचा शोध घेण्यात आला. तेव्हापासून त्याला धमकी देणारे पत्र येत आहेत.

Image Credited – Aajtak

रॉबर्टो म्हणाला की, अ‍ॅपल कंपनीचे म्हणणे आहे की त्यांचा फोन जगातील सर्वात सुरक्षित फोन आहे. असे असेल तर माझा फोन हॅक कसा झाला. आधी झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांमुळे आयफोन खरेदी केला होता. मात्र हा देखील हॅक झाला. रॉबर्टोच्या कायदेशीर नोटीसमध्ये लिहिले आहे की, इतरांना माहिती मिळाल्याने तो आता अंडरग्राउंड झाला आहे. सुरक्षितता भंग पावणे, मानसिक दबाव या गोष्टींसाठी अ‍ॅपलवर कारवाई करण्यात यावी.

Image Credited – Medium

रॉबर्टोने काही महिन्यांपुर्वी स्वतःचा फोल्डेबल स्मार्टफोन देखील लाँच केला होता. रॉबर्टो पाब्लोच्या ड्रग व्यवसाय मेडेलिन कार्टेलचा अकाउंटेंट होता. त्यामुळे त्याच्या जीवाला नेहमी धोका असतो.

Leave a Comment