महिलेने बाळाचे नाव ठेवले सोनू सूद, अभिनेता म्हणाला हा सर्वात मोठा पुरस्कार

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपआपल्या घरी जाण्यासाठी मदत करत आहे. हजारो कामगारांसाठी सोनू सूद देवदूत बनून पुढे आला आहे. सोनू सूदच्या या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतूक केले जात आहे. घरी पोहचवण्यासाठी लोक त्याचे आभार मानत आहे. यातच आता सोनूच्या मदतीचे आभार मानण्यासाठी एका महिलेने आपल्या नवजात बाळाचे नाव चक्क सोनू सूद ठेवल्याचे समोर आले आहे. एका ट्विटर युजरने याबाबत माहिती शेअर केली.

फरहान नावाच्या ट्विटर युजरने सांगितले की, गर्भवती महिलेला मुंबईवरून दरभंगा जायचे होते. अशा स्थितीमध्ये सोनू सूदने त्यांची मदत केली. सोनूच्या मदतीमुळे महिला दरभंगाला पोहचू शकली. आता त्या महिलेने आपल्या बाळाचे नाव सोनू सूद ठेवले आहे.

सोनू सूदने देखील हे ट्विट रिट्विट करत हा माझा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे म्हटले आहे.

Image Credited – The Indian Express

सोनू सूद सोशल मीडियावर प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मेसेजला उत्तर देत असून, प्रत्येकाच्या मदतीसाठी पुढे येत आहे. सोशल मीडियावर या अभिनेत्याचे भरभरून कौतूक केले जात आहे.

Leave a Comment