षडयंत्र…! कोणासोबतही शेअर करु नका व्हॉट्सअॅप संदर्भातील माहिती


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगासह आपल्या देशातही लॉकडाऊन लागू आहे. या संकटकाळात आपल्या मदतीसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ही दोन्ही अॅप महत्वपूर्ण कार्य करत आहेत. त्यातच आपल्या जवळच्या व्यक्तिंसोबत आपण या अॅपच्या मदतीने संवाद साधण्यापासून ते व्हिडीओ कॉलपर्यंत तसेच अगदी एकमेकांचे महत्त्वाचे तपशील देखील आपण शेअर करत असतो. पण या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात सायबर क्राइम आणि ऑनलाइन फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे.


त्यातच आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून होणारा आणखी एक नवीन घोटाळा समोर आला आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअॅप टेक्नॉलॉजी टीमचा अधिकृत कम्युनिकेशनचा सोर्स असल्याचे सांगून आपल्याकडून 2 स्टेप व्हेरिफिकेशन कोड मागत आहे. त्यांनी या अकाऊंटची सत्यता दाखवण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या प्रोफाईल फोटोचा वापर केला आहे. व्हॉट्सअॅप युझर्सनी अशा प्रकारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही युझर्सला व्हॉट्सअॅप कंपनी मेसेज करत नाही. त्याचबरोबर कंपनीला कोणतीही अधिकृत घोषणा अथवा माहिती द्यायची असल्यास अधिकृत ट्विट केले जाते किंवा ब्लॉगच्या माध्यमातून माहिती दिली जाते.

दरम्यान या नव्या घोटाळ्याबद्दलची माहिती व्हॉट्सअॅप चं फीचर ट्रॅक करणाऱ्या ब्लॉक WABetaInfo ने ट्विट करून दिली आहे. ट्विटरच्या युजर डॅरियो नवारोने वापरकर्त्यांकडून मिळालेल्या या घोटाळ्याच्या संदेशाविषयी चौकशी केली. सोशल मीडियावर शेअर नवारोने केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, स्पेनिशभाषेतून घोटाळेबाजाने मेसेज पाठवला असून त्याने मोबाईल नंबर आणि व्हेरिफिकेशन कोड मागितला. त्यामुळे यापुढे तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी, मोबाईल नंबर, टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी येणारे कोड यासंबंधीची कोणतीही माहिती कुणासोबतही शेअर करू नका. अशा प्रकारचे येणारे मेसेज हे फेक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment