कोरोना इफेक्ट : कार मेकर्स आता नवीन फीचर्स पेक्षा देत आहेत हायजिनला प्राधान्य

कार खरेदी करताना सर्वसाधारणपणे कंपनी, इंजिन, कंफर्ट आणि इतर फीचर्सचा विचार करून खरेदी केली जात असे. मात्र आता कोरोना व्हायरस महामारीच्या काळात या गोष्टींसह वाहन खरेदी करताना अनेक गोष्टींचा विचार केला जात आहे. महामारीच्या काळात कार किती सुरक्षित आहे याचा विचार ग्राहक करत असल्याने आता आता उत्पादक वाहनांमध्ये खास तंत्रज्ञान, उपकरण देत आहे. सोबतच दावा केला जात आहे की हे तंत्रज्ञान व्हायरस आणि बॅक्टेरियापासून बचाव करेल.

याचेच एक उदाहरण म्हणजे यूरोपियन बाजारात काही दिवसांपुर्वीच लाँच झालेल्या फियाटच्या 500 हायब्रिट आणि पांडा हायब्रिट या कार्स. या दोन्ही कार्समध्ये ‘D-Fence’ नावाचे पॅकेज देण्यात आले असून, यात एअर फिल्टर, प्युरिफायर आणि यूव्ही लाईट टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने स्टेअरिंग, डॅशबोर्ड आणि सीट्सवरील व्हायरस नष्ट करते.

Image credited – Al Jazeera

एमजी ब्रँडची कंपनी SAIC ने देखील त्यांच्या काही कारमध्ये यूव्ही लँम्प देण्यात आल्याचा दावा केला आहे. तर गुआंगझोउ ऑटोमोबाईल कंपनीने दावा केला आहे की त्यांच्या कार्समध्ये ट्रिपल फिल्टरेशन सिस्टम दिली आहे. वॉल्वो आणि लोट्सची कंपनी गिलीने देखील अशाच प्रकारचा दावा केला होता.

Image Credited – Business Insider

काही दिवसांपुर्वी एका पेंट कंपनीने देखील दावा केला आहे की त्यांना वाहानांसाठी अँटीव्हायरस कोटिंग तयार केले आहे. काही जणांच्या मते हे तंत्रज्ञान काही काळासाठी चालेल, तर काही तज्ञांच्या मते महामारी संकटाच्या काळात कंपन्या उत्पादन विकण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. भारतात देखील अनेक कार कंपन्या व्हायरसपासून बचावासाठी खास तंत्रज्ञान देत आहेत. प्रदुषणाचे प्रमाण वाढल्याने अनेक कंपन्या कारमध्ये एअर प्युरिफायर्स देत आहेत.

Leave a Comment