उद्धव ठाकरेंकडून बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ


मुंबई : बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार, आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार, इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार तसेच इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

दरम्यान मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी कोरोनासारख्या संकटच्या काळात आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य सेवकांच्या वेतनात कपात केल्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात यांनी दाद मागितली होते. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. अमित ठाकरे यांनी या पत्रात म्हटले होते की, आरोग्य सेवकांच्या सेवेचे सध्याच्या परिस्थितीत मोलच होऊ शकत नाही. त्याचबरोबर सध्याच्या घडीला ते एवढी मेहनत करत आहेत. त्यांच्या परिश्रमाच मोल त्यांना अधिक भत्ता देऊन करायला हवे, मानधन कमी करून नाही, असे अमित ठाकरे यांनी म्हटले होते.

Leave a Comment