आनंद महिंद्रांना घालायची आहे या शब्दावर बंदी, नेटकऱ्यांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘वेबिनार’ या शब्दावर बंदी घालण्यात यावी असे म्हटले आहे. लॉकडाऊनच्या काळात वेबिनार हा शब्द चर्चेत आला आहे. वेबिनार अर्थात व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग किंवा व्हिडीओद्वारे सेमिनार-मिटिंगमध्ये सहभागी होणे. मात्र आनंद महिंद्रा यांना हा शब्द फारसा आवडलेला नाही.

त्यांनी ट्विट केले की, जर मला आणखी एका वेबिनारचे आमंत्रण मिळाल्यास, मी आतून हादरून जाईल. हा शब्द आताच आला असला तरी डिक्शनरीतून हटवण्यासाठी यासाठी याचिका दाखल करू शकतो का ?

सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांचे ट्विट लगेच व्हायरल झाले. आतापर्यंत या ट्विटला 3 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी लाईक केले आहे. तर शेकडो युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की कोव्हिड-19 पेक्षा जास्त भिती वेबिनारची वाटते. या पेक्षातर ऑफिसमध्ये जाऊन काम केले असते. वेबिनार शब्दावर बंदी घालण्यासाठी आनंद महिंद्रा यांच्या फॉलोअर्सनी देखील सहमती दर्शवली.

Loading RSS Feed

Leave a Comment