103 वर्षीय आजींनी केली कोरोनावर मात, बिअर पिऊन व्यक्त केला आनंद

कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत लाखो लोकांचा मृत्यू होत असताना दुसरीकडे एका 103 वर्षीय वृद्ध महिलेने कोरोनावर मात केली आहे. अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स येथील 103 वर्षीय जेनी स्टेंना यांना कोरोनावर मात करत आपल्या आवडीची बिअर पिऊन आनंद व्यक्त केला.

जेनी यांची नात शेल्ली गन म्हणाली की, त्यांच्यामध्ये एक लढाऊवृत्ती आहे. त्यांनी कधीही हार मानली नाही. 3 आठवड्यांपुर्वी आपल्या नर्सिंग होममध्ये कोरोनाची लागण झालेल्या जेनी या पहिल्या महिला होत्या.

जेनी यांची तब्येत अधिकच बिघडल्याने गन, तिचे पती अ‍ॅडम आणि 4 वर्षीय मुलगी वॉयलेट यांना वाटले की ही त्यांची अखेरची भेट असेल. मात्र 13 मे ला अचानक जेनी यांची तब्येत सुधारली असल्याची त्यांना माहिती मिळाली.

कोरोनावर मात केल्यानंतर जेनी स्टेना यांनी आपल्या आवडीची बिअर पिऊन आनंद व्यक्त केला. जेनी यांना 2 मुले, 3 नातवंड, 4 पतवंड व त्यांचीही 3 मुले आहेत.

Leave a Comment