लवकरच येतोय वनप्लसचा स्वस्त फोन

फोटो साभार यु ट्यूब

गेले काही महिने येत असलेल्या लिक्सवरून वनप्लस स्वस्त फोन आणण्याच्या तयारीत असल्याचे आडाखे बांधले जात होते मात्र आता कंपनीचे सीईओ पेट लाऊ यांनीच कंपनी लवकरच स्वस्त फोन आणत असल्याचे जाहीर केले आहे. ३० ते ४० हजार प्राईस रेंज मधील हा फोन वनप्लस झेड असेल असे संकेत दिले जात आहेत.

या वर्षी वनप्लसने वनप्लस एट सिरीज मधील फोन बाजारात आणले आहेत मात्र ते कंपनीचे सर्वात महाग फोन आहेत. वनप्लस झेड सर्वप्रथम भारतीय बाजारात आणला जाईल असे सांगितले जात आहे. एका मुलाखतीत लाऊ यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यावेळी बोलताना त्यांनी भारतीय युजर्स लवकरच एक नवीन फोन संबंधी घोषणा ऐकतील असे म्हटले होते.

लिक फिचर्स नुसार या फोनला ६.४ इंची अमोलेड डिस्प्ले, पंचहोल सेल्फी कॅमेरा, ५ जी सपोर्ट, ८ जीबी रॅम, १२८ आणि २५६ जीबी स्टोरेज, रिअरला ट्रिपल कॅमेरा सेटअप, पैकी मेन कॅमेरा ४८ एमपीचा, १२ एमपी वाईड अँगल लेन्स, मॅक्रो सेन्सर, सेल्फी साठी १६ एमपी कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी असेल.

Leave a Comment