या व्हिडीओतील तरंगणारी मुलगी बघून नेटिझन्स पडले संभ्रमात

सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की तरूणी दोरी पकडून तलावात उडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. तरूणी उडी मारण्याचा देखील प्रयत्न करते, मात्र अचानक असे काहीतरी घडते की ती काही वेळासाठी चक्क हवेतच तरंगते. नेटकरी देखील हा व्हिडीओ पाहून संभ्रमात पडले आहेत. या व्हिडीओला मयका शई नावाच्या इंस्टाग्राम युजरने शेअर केले आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, दोन मुली शिडीच्या मदतीने वरती चढतात. यानंतर एक मुलगी दोरीचा झोका घेऊन तलावात उडी मारण्याचा प्रयत्न करते. मात्र मध्येच तिचा तोल ढासळतो व ती तलावात पडते. मात्र तलावात पडण्याआधी ती काही सेंकद चक्क हवेत तरंगताना दिसते. असे कसे झाले याचा नेटकरी देखील विचार करत आहेत.

https://www.instagram.com/p/CAVFKY7g_aV/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडीओ शेअर करत मयकाने लिहिले की, 2020 ने अशा प्रकारे मला झटका दिला. माझ्या बहिणीने नक्कीच तुम्हाला हसवले असेल.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अडीच लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे. तर शेकडो युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट केली हा आतापर्यंतचा सर्वोत्तम व्हिडीओ आहे. तर आणखी एका युजरने लिहिले की व्हिडीओत दिसणाऱ्या पातळ दोरीमुळे असे झाले.

Leave a Comment