कोरोना संकटात डॉक्टर आणि नर्सने चक्क हॉस्पिटलमध्येच केले लग्न

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, आतापर्यंत लाखो लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. या कठीण काळातच ब्रिटनच्या लंडन येथील एका डॉक्टर आणि नर्सने चक्क ज्या हॉस्पिटलमध्ये काम करतात तेथेच लग्न केले आहे. या जोडप्याच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. 34 वर्षीय जॅन टिप्पिंग आणि 30 वर्षीय अन्नालन नवरत्म यांनी ऑगस्टमधील आपले पुर्वनियोजित लग्न रद्द केले होते. या संकटाच्या काळात त्यांचे पालक नॉर्थन आयर्लंड आणि श्रीलंकेवरून ब्रिटनला येऊ शकले नसते.

Image Credited – Twitter

या जोडप्याने लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये एप्रिल महिन्यात विवाह केला. त्यांचे कुटुंब व मित्र ऑनलाईन या लग्नात सहभागी झाले होते. टिप्पिंग म्हणाल्या की, आम्हाला आमचे सर्व कुटुंब निरोगी असताना लग्न करायचे होते. मग भलेही ते ऑनलाईन आम्हाला पाहत असतील. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी लग्नाची परवानगी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली. जेथे काम करतो तेथे लग्न करताना जरा विचित्रच वाटले.

या जोडप्याने 24 एप्रिलला लग्न केले होते, ज्याचे फोटो हॉस्पिटलने दोन दिवसांपुर्वी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून, युजर्स या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.

Image Credited – Twitter

नवरत्नम म्हणाले की, जॅन आणि मला आम्ही जेव्हापासून भेटलो होतो तेव्हापासूनच लवकरात लवकर लग्न करायचे होते. एकमेंकाना दिलेले वचन पाळल्याने आम्ही आनंदी आहोत व हॉस्पिटलने हे करण्यास आम्हाला मदत केली.

Leave a Comment