पुलवामा सारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न, सुरक्षा दलांनी उधळला कट

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने एक मोठा कार बॉम्ब धमका घडवून आणण्याचा डाव उधळून लावला आहे. सुरक्षा दलांनी 20 किलो पेक्षा अधिक आयईडी घेऊन जाणाऱ्या कारला रोखले. मागील वर्षी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हा कट दहशतवाद्यांनी रचला होता. पोलिसांनी सांगितले की,  बनावट रजिस्ट्रेशन असणारी पांढरी ह्युंडाई सँट्रो कार बुधवारी रात्री चेक पॉइंटवर थांबविण्यात आले. मात्र कार चालकाने गाडीचा वेग वाढवला व बॅरिकेट्स तोडून निघून गेला.

यानंतर सुरक्षा दलाने फायरिंग केल्यावर चालक आयईडी असलेली कार तेथेच सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला. आम्हाला हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही कारचा शोध घेत होतो, अशी माहिती आयजी विजय कुमार यांनी सांगितले.

बॉम्ब स्कॉटच्या मदतीने कारसह आईडी नष्ट करण्यात आले. या धमाक्यात आजुबाजूच्या भागातील घरांचे नुकसान झाले आहे. कारवर रात्रभर पाहारा ठेवण्यात आला. आजुबाजूच्या घरातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आल्यानंतर बॉम्ब स्कॉटच्या मदतीने कार नष्ट करण्यात आल्याची माहिती डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली. सैन्य, पोलिस आणि निमलष्करी दलांचे हे संयुक्त ऑपरेशन होते.

मागील वर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामामध्येच 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. दरम्यान मागील दोन महिन्यात जम्मू-काश्मिरमध्ये अनेकदा दहशतवादी हल्ले झाले असून, 30 अधिकाऱ्यांना यात आपले प्राण गमवावे लागले. तर 38 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

Leave a Comment