पुढील वर्षी भारतात दाखल होणार ओलाची इलेक्ट्रिक टू-व्हिलर


खासगी टॅक्सी सर्व्हिस देण्यात अग्रस्थानी असलेली ओला कंपनी (OLA) आता बाजारपेठेत इलेक्ट्रिक टू व्हिलर आणण्याच्या तयारीत आहे. भारतात आणि ग्लोबल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी ओलाची सहाय्यक कंपनी ओला इलेक्ट्रीक लॉन्च करणार आहे. ओला इलेक्ट्रिकने यासाठी नेदरलँडची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी Etergo BV चे अधिग्रहण केले आहे. ओला इलेक्ट्रिक पुढील वर्षात त्यांची टू-व्हिलर भारतीय बाजारपेठेत उतरवणार आहे.

2014 मध्ये नेदरलँडमधील इलेक्ट्रिक कंपनी Etergo ची स्थापना झाली होती. अॅपस्कूटरसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. इनोव्हेटिव्ह डिझाइन आणि इंजिनिअरिंगसाठी या स्कूटरने जभरातील खुप पुरस्कार मिळवले आहेत. CES 2019 चे काही पुरस्कार आणि जर्मनीचे ऑटोमोटिव ब्रँन्ड कॉन्टेस्ट पुरस्कार यांचा यामध्ये समावेश आहे.


पहिल्यांदा 2018 मध्ये Etergo अॅपस्कूटर सादर करण्यात आली होती. एकदा चार्जिंग केल्यावर ही इलेक्ट्रिक स्कूटर 240 किमी पर्यंत चालते. हायएनर्जी डेंसिटी बॅटरी यामध्ये देण्यात आली असून ती स्वॅप केली जाऊ शकते. त्याचबरोबर कंपनीने असा दावा केला आहे की, 3.9 सेकंदात अॅपस्कूटरमध्ये 0 ते 45 किमी प्रति तास वेग पकडण्याची क्षमता आहे. TFT Instrument कंसोल अॅपस्कूटरमध्ये देण्यात आला आहे. स्कूटरच्या सीट खाली 50 लीटर स्टोरेजची क्षमता आहे.

याबाबत माहिती देताना ओला इलेक्ट्रिकचे फाउंडर आणि चेअरमॅन भावेश अग्रवाल यांनी असे म्हटले आहे की, मोबिलिटीचे भविष्य इलेक्ट्रिक आहे आणि कोरोनानंतर जागतिक स्तरावर इलेक्ट्रिकचा अधिकाधिक उपयोग केला जाईल. प्रत्येक वर्षात जगभरात चारचाकी गाड्यांच्या तुलनेत दुप्पट टू-व्हिलर्सची विक्री करण्यात येते.

Leave a Comment