स्वतः कामगारांसाठी 68 हजारांची विमान तिकिटे खरेदी करत शेतकऱ्याने जपली माणुसकी

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याने परराज्यात अडकलेले कामगार आपआपल्या घरी निघाले आहेत. रेल्वे आणि विमानसेवा सुरू केल्यानंतर नागरिकांना आपल्या घरी जाणे सोपे झाले आहे. मात्र अशा स्थितीतही काहीजण आर्थिक अडचणींमुळे प्रवासाचे पैसे भरू शकत नाहीत. या लोकांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे आले आहेत. अशाच प्रकारे पप्पन गहलोत हे शेतकरी आपल्या 10 कामगारांच्या मदतीसाठी पुढे आले आहे.

पप्पन गहलोत यांनी आपल्या इथे काम करणाऱ्या 10 कामगारांना घरी जाण्यासाठी स्वतःच्या खर्चाने विमान तिकिटे काढली. यासाठी त्यांना 68 हजार रुपये खर्च आला. पप्पन हे मशरूमची शेती करतात. हे कामगार मागील 20 वर्षांपासून त्यांच्या येथे काम करतात. कोरोनामुळे त्यांना आपआपल्या घरी जायचे होते. आधी त्यांना रेल्वे तिकिट काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिकिटे मिळाली नाहीत. अखेर त्यांनी विमानाची तिकिटे काढत त्यांना दिल्लीवरून पाटणाला पाठवले.

Image Credited – oneindia

विमानात बसेल असा कधी विचारच केला नव्हता. मालकाने तिकिट खरेदी केले, असे कामगार म्हणाले.

Leave a Comment