हॉटस्टारवर होणार ‘लक्ष्मी बॉम्ब’चा धमाका


अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट आता अखेर डिजिटली रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा हा बहुचर्चित चित्रपट हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हॉटस्टारला या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तब्बल १२५ कोटी रुपयांना विकल्याचे सांगण्यात येत आहे.

संपूर्ण देशात कोरोना व्हायरसमुळे जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. परिणामी याचे थेट परिणाम सर्वच क्षेत्रांवर पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे चित्रपटगृहांमध्येही गेल्या काही काळापासून सिनेमे दाखल झालेले नाहीत. याचा फटका अनेक बड्या कलाकारांच्या चित्रपटांना बसला आहे. ज्यानंतर आता अतिशय प्रभावी आणि फार कमी कालावधीत तितक्याच झपाट्याने लोकप्रियता मिळवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे निर्माते- दिग्दर्शक आणि कलाकारांचा ओघ वाढू लागला आहे.

अक्षय तामिळ चित्रपट ‘कांचना’चा रिमेक असणाऱ्या या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून एका तृतीयपंथी व्यक्तीच्या आत्म्याने ज्याला झपाटलेले असते, असे चित्रपटातून दाखवण्यात येणार असल्यामुळे चाहत्यांसाठी त्याची ही आगळीवेगळी भूमिका पाहणे पर्वणी ठरणार आहे.

Leave a Comment