जो बिडेन यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा मूर्ख असा उल्लेख


वॉशिंग्टन – अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार असलेले जो बिडेन यांनी ‘मूर्ख’ असे संबोधले आहे. बिडेन म्हणाले की, लोकांना चुकीचा सल्ला देऊन ट्रम्प मृतांचा आकडा वाढवत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे कुशल नेतृत्वाचे लक्षण आहे. दोन महिन्यांहून अधिक दिवसांनी पहिल्यांदा जेव्हा ते लोकांच्यामध्ये मास्क घालून बाहेर आले होते तेव्हा बिडेन यांच्यावर ट्रम्प यांनी निशाणा साधला.

बिडेन गेल्या काही महिन्यांपासून डेलावेर येथील त्यांच्या घरी होते. माजी सैनिकांच्या स्मारकात ते पुष्पहार घालण्यासाठी पत्नी जिलसोबत गेले होते. दरम्यान मास्क घातलेल्या बिडेन यांचा फोटो रिट्विट करत ट्रम्प यांनी थट्टा केली होती. यासंदर्भात सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत बिडेन म्हणाले की, ट्रम्प हे पूर्णपणे मूर्ख असून जे अशाप्रकारे बोलत आहेत. अमेरिकेतील एक लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील निम्म्या जणांचा मृत्यू रोखता आला असता. पण ट्रम्प यांच्या दुर्लक्षपणा आणि अहंकार यात अडथळा आणत असल्याचे बिडेन म्हणाले.

ट्रम्प यांनी राजधानीत ४ जुलै रोजी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्याचा विचार केला होता. पण कोरोनाचा मोठा परिणाम या क्षेत्रावर झाला असल्यामुळे एखाद्या मोठ्या सोहळ्यासाठी तयार नसल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी सांगितले. पण हा सोहळा होणार असे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जड फियर यांनी सांगितले आहे.

Leave a Comment