गुगलचे डिजिटल पेमेंट अॅप गुगल पे ने आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक फीचर लाँच केले आहेत. हे फीचर्स कोरोना संकटाच्या काळात युजर्सच्या उपयोगी येतील. या अॅपमध्ये नियरबाइ स्टोर्स फीचर देण्यात आले आहे. हे फीचर देशातील 35 शहरांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या शहरांमध्ये नवी दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, कोलकत्ता या शहरांसह महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड या शहरांचा समावेश आहे.
‘गुगल पे’मध्ये आले नियरबाइ स्टोर्ससह हे खास फीचर

गुगल पे द्वारे आता युजर्स एचपी गॅस, भारत पेट्रोलियम आणि इनडेनचे घरगुती गॅस सिलेंडर बुक करू शकतील. अँड्राईड आणि आयओएस दोन्ही युजर्स अॅपद्वारे बुकिंग आणि पेमेंट करू शकतील. नियरबाइ स्टोर्स फीचर अॅपच्या बिझनेस अँड बिल्स कॅटेगरीमध्ये दिसेल. या फीचरद्वारे स्टोरचे अंतर, वेळ आणि कॅटेगरी, जनरल स्टोर्स आणि मेडिकलच्या दुकानांबाबत माहिती मिळेल. याशिवाय लिस्टेड बिझनेस आपल्याकडील वस्तूंना हायलाईट करू शकतील.

गुगलने माहिती दिली की युजर्स हे देखील तपासू शकतील की सोशल दुकानात सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले जात आहे की नाही. या फीचरमुळे कोरोना महामारीच्या काळात युजरला सुरक्षित राहण्यास मदत होईल. मुंबईमधील युजर दुकान कंटेनमेंट झोनमध्ये आहे की नाही, हे देखील पाहू शकतील. पेमेंट अॅपमध्ये युजर्सला कोरोना व्हायरस स्पॉट फीचर देखील मिळेल. यात युजर्सला आरोग्य मंत्रालयाकडून सुरक्षेसाठी जारी करण्यात आलेले दिशानिर्देशची माहिती मिळेल.