ट्विटरला याचे परिणाम भोगावे लागणार – ट्रम्प

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट्समधील माहिती चुकीची असून, फॅक्ट चेक करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. तसेच मेल इन बॅलेट्स बनावट असल्याचे म्हटले होते.

ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेले हे आरोप ट्विटरला चांगलेच महागात पडले असून, ट्विटर हे अभिव्यक्ती स्वतंत्र्यावर गदा आणत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्विटर 2020 च्या राष्ट्रपती निवडणुकीत हस्तक्षेप करत असून, माझे मेल इन बॅलेट्सचे वक्तव्य चुकीचे आहे. सोबतच त्यांनी ट्विटर बंद करण्याची देखील धमकी देखील दिली आहे.

ट्रम्प यांनी ट्विट केले की, रिपब्लिक्न्सला वाटते की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कंझर्वेटिव्ह आवाजांना दाबण्याचा प्रयत्न करतात. असे होण्याआधी हे प्लॅटफॉर्म्स बंद केले जातील. 2019 मध्ये असा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे आपण पाहिले. आपल्या देशात मेल-इन बॅलेट्सचा शिरकाव होऊ देणार नाही. फसवणूक, चोरीपासून हे लांब असेल.

ट्विटरवर टीका करत ट्रम्प म्हणाले की, ट्विटरने दाखवून दिले आम्ही एवढ्या दिवसांपासून या कंपन्यांविषयी जे बोलत आहोत, ते सत्य होते. लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल.

या सर्व प्रकारात ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी ट्रम्प यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, कंपनीच्या कार्यासाठी ते जबाबदार असून, कर्मचाऱ्यांना यापासून लांब ठेवण्यात यावे. तसेच ट्विटर जागतिक स्तरावरील निवडणुकी संबंधी चुकीची व खोटी माहिती नेहमीच समोर आणेल. हे काही आम्हाला सत्याचा न्याय करणारे न्यायाधीश ठरवत नाही. आमचा उद्देश केवळ योग्य माहिती समोर आणणे आहे, जेणेकरून लोक स्वतः योग्य ती बाजू घेऊ शकतील.

Leave a Comment