सोशल डिस्टेंसिंगसाठी 6 फूट अंतर पुरेसे नाही, इतक्या फूटापर्यंत पसरू शकतो व्हायरस

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सोशल डिस्टेंसिंगचे आवाहन केले जात आहे. यासाठी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फूट अंतर ठेवल्याने व्हायरसपासून वाचता येईल असे वाटत होते. मात्र एका अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार खोकणे, शिंकणे आणि श्वासामधून निघणाऱ्या द्रवांसोबत घातक व्हायरस 20 फूटांपर्यंत जाऊ शकतो.

Image Credited – wikimedia

अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनुसार कोरोना व्हायरस अनुकूल परिस्थितीमध्ये तीन पट अधिक लांब पसरू शकतो. आधी झालेल्या एका रिसर्चनुसार खोकणे, शिंकणे आणि बोलण्याने 40 हजार ड्रॉपलेट (थेंब) निर्माण होतात. यांचा वेग प्रती सेंकद शेकडो मीटर देखील असू शकतो.

Image Credited – ThePrint

medrXiv मध्ये प्रकाशित संशोधनानुसार वैज्ञानिकांनी श्वासातून निघणाऱ्या ड्रॉपलेटचा तापमान, दमटपणा आणि वेंटिलेशन कंडिशनमध्ये अंदाज घेण्यासाठी एक व्यापक गणितीय मॉडेलची मदत घेतली. यात आढळले की रेस्पिरेटरी ड्रॉपलेटद्वारे व्हायरसच्या प्रसाराच्या दोन पद्धती आहेत. हा व्हायरस जवळील संपर्कात ट्रांसमिशनद्वारे आणि लांबून एयरोसोल एक्सपोजरद्वारे पसरतो.

Image Credited – financialexpress

वैज्ञानिकांनुसार ड्रॉपलेट गुरुत्वाकर्षणामुळे आजुबाजूलाच राहतो. तर हलके ड्रॉपलेट वेगाने बाष्पीभवनात एयरोसोल पार्टिकल बनतात. हवेत व्हायरसच्या हालचालीवर हवामानाचा प्रभाव नेहमीच एकसारखा नसतो. कमी तापमानात जवळपास प्रसार होतो, तर जास्त तापमान आणि अधिक आर्द्रतेत लहान एयरोसेल पार्टिकल बनतात. थंड आणि आर्द्रतेच्या हवामानात ड्रॉपलेट 19.7 मीटर पर्यंत जाऊ शकते. फेस मास्क लावल्याने एयरोसोल पार्टिकलद्वारे पसरणारे संक्रमण कमी करता येईल. मात्र मोठ्या ट्रॉपलेटच्या संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग गरजेचे आहे.

Leave a Comment