कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे भाजप प्रवक्ते संबित पात्रा रुग्णालयात दाखल


गुरुग्राम – कोरोनाची लक्षण आढळल्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पात्रा यांच्यावर गुरुग्राममधील मेडांटा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्याच आल्याची माहिती सुत्रांनी दिले आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता असलेले पात्रा हे अनेक टीव्ही चर्चांमध्ये भाजपची बाजू मांडत असतात. याव्यतिरीक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून संबित पात्रा पक्षाची बाजू मांडत असतात. त्यांच्या तब्येतीबद्दलची अधिक माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Leave a Comment