आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुख पदावर अनेक भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. सुंदर पिचाई, सत्या नडेला ही यातील काही प्रमुख नावे. आता आणखी एका भारतीयाचे नाव या यादीत जोडले गेले आहे. व्हिडीओ चॅट अॅप कंपनी झूम इंकने भारतीय वंशाचे वेल्चमी शंकरलिंगम यांना कंपनीचे इंजिनिअरिंग प्रमूख बनवले आहे. शंकरलिंगम थेट कंपनीचे सीईओ एरिक एस यूआन यांना रिपोर्ट करतील. ते कंपनीच्या इंजिनिअरिंग प्रोडक्ट आणि डेव्हलपमेंट विभागाचे काम पाहतील.
आंतरराष्ट्रीय कंपनीच्या टॉपवर आणखी एक भारतीय, झूमच्या इंजिनिअरिंग प्रमूखपदी वेल्चमी शंकरलिंगम
शंकरलिंगम यांनी जवळपास 9 वर्ष सॉफ्टवेअर कंपनी व्हीएमवेअरमध्ये काम केले आहे. तेथे ते क्लाउड सर्व्हिसेज डेव्हलपमेंट आणि ऑपरेशन्सचे सिनियर वॉइस प्रेसिडेंट होते. व्हीएमवेअरच्या आधी ते वेबईएक्स कंपनीत इंजिनिअरिंग आणि टेक्निकल ऑपरेशनचे वॉइस प्रेसिडेंट होते.
शंकरलिंगम यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार त्यांना हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस इंडस्ट्रीचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी चैन्नईच्या अण्णा यूनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्यूनिकेशन्समध्ये बीई केले आहे. 1989-90 मध्ये अमेरिकेच्या नॉर्दर्न इलिनोइस यूनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएस व स्टोनी ब्रुक यूनिव्हर्सिटीमधून बिझनेस पॉलिसीमध्ये देखील एमएस केले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये झूम अॅपची लोकप्रियता जगभरात वाढली होती. कोट्यावधी युजर्सने या अॅपला लॉकडाऊनमध्ये डाऊनलोड केले आहे. असे असले तरी या अॅपच्या प्रायव्हेसीवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत.