येतेय जेमोपाई ‘मिसो’ मिनी इलेक्ट्रिक स्कुटर

फोटो साभार पेहेल न्यूज

इलेक्ट्रिक स्कुटर उत्पादक जेमोपाई भारतीय बाजारात नवीन मिनी स्कुटर ‘मिसो’ नावाने सादर करत असून त्याचा टीझर नुकताच जारी केला गेला आहे. जूनच्या महिन्यात ही मिनी स्कुटर बाजारात दाखल होईल असे समजते. ही मिनी स्कुटर इफिशियंट, व्हॅल्यु फॉर मनी व कम्फर्टेबल पर्सनल मोबिलिटी वाहन असल्याचा कंपनीचा दावा आहे. करोनाच्या वातावरणात वैयक्तिक वापरासाठी ही स्कुटर उत्तम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

जेमोपाई मिसो दोन प्रकारात सादर होत आहे. पर्सनल वापर आणि सामान वाहून नेणारी मालवाहक असे हे दोन प्रकार आहेत. तिला स्टँडर्ड लोडिंग कॅरीअर दिले गेले आहे तशी ती विना कॅरीअर सुद्धा मिळणार आहे. ही मिनी स्कुटर पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. बॅटरी पॅक सोडून तिचे असेम्बलिंग आणि उत्पादन भारतात केले गेले आहे. या स्कुटरला बॅटरीचे अनेक पर्याय दिले गेले आहेत.

एका फुल चार्ज मध्ये ही स्कुटर ६५ किमी जाते. गोरीन ई मोबिलिटी व ओपाई इलेक्ट्रिक यांचे हे संयुक्त उत्पादन आहे. गोरीन २०१६ मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे तर ओपाई कडे १५ वर्षाचा इलेक्ट्रिक टू व्हीलर्स विकण्याचा अनुभव आहे. त्यांनी आत्तापर्यंत दीड कोटी पेक्षा जास्त वाहने विकल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment