खिलाडी अक्षयने पुन्हा पुढे केला मदतीचा हात

फोटो साभार पिपिंग मून

बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार याने सिने कलाकारांना मदतीसाठी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. देशात करोना संकट आणि लॉकडाऊन मुळे अनेकांवर कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड लक्षात घेऊन अक्षयने सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या (सिंटा) १५०० सदस्यांना दरमहा ३ हजार रुपये देता यावेत यासाठी या असोसिएशनकडे ४५ लाख रुपये सोपविले आहेत.

या पैशातून या ज्युनिअर आर्टिस्ट आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांना त्यांना पुन्हा काम मिळेपर्यंत दरमहा ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. सिंटाचे पदाधिकारी अमित बहल यांनी सिंटा सदस्य अयुब खान यांना संस्थेकडे फंड कमी असल्याचे आणि त्यामुळे सदस्यांना मदत करण्यात अडचण येत असल्याचे सांगितले त्यावर अयुब यांनी अक्षय कुमार यांच्याशी बोलणे केले. अक्षय कुमारने ताबडतोड सिंटा सदस्यांची यादी मागवली आणि ४५ लाखचा चेक त्यांच्या स्वाधीन केला. सिंटा सदस्यांनी अक्षयने दाखविलेल्या माणुसकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

करोना संकटात अक्षयने यापूर्वी पीएम केअर्स फंडात २५ कोटी तर बीएमसीला ३ कोटींची मदत केली आहे.

Leave a Comment