साक्षी मलिक घराच्या आखाड्यात करतेय मेहनत

फोटो साभार नवभारत टाईम्स

भारताची राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती पहिलवान साक्षी मलिक सध्या घरच्याच आखाड्यात मेहनत करत असून पारंपारिक पद्धतीने तिची ही मेहनत सुरु आहे. आखाडा नांगरून काढणे या प्रकारचे पारंपारिक प्रकार त्यासाठी ती वापरत आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने खेळ प्रशिक्षण सुरु करण्यास हिरवा झेंडा दाखविला असला तरी करोना मुळे हे प्रशिक्षण पूर्ण क्षमतेने सुरु होण्यास वेळ जाणार आहे. ऑलिम्पिक १ वर्षासाठी पुढे ढकलले गेले आहे. या विषयी साक्षी सांगते तिने ऑलिम्पिक क्वालीफाय साठी चांगली तयारी केली होती.

साक्षी सांगते करोनामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या त्यामुळे सर्वच खेळाडू निराश झाले आहेत. आम्ही सर्व खेळाडू ऑलिम्पिक साठी कसून सराव करत होतो त्यामुळे ऑलिम्पिक पुढे गेल्याचा धक्का जरूर बसला. गेलेली वेळ परत येतेच असे नाही. अर्थात यात कुणाच्याच हातात काही नाही अशी परिस्थिती आहे. पण प्रत्येक वाईटातून काही चांगले घडते यावर माझा विश्वास आहे.

सध्या मिळालेला वेळ घरी घालाविते आहे. यामुळे पती सत्यव्रतचा अधिक सहवास मिळतो आहे. गुढग्यावर सर्जरी झाल्यानंतर मी १ महिना सरावापासून दूर होते. पुन्हा खेळाच्या मैदानात यायचे आहे. त्यासाठी घरीच पतीच्या सल्ल्याने सराव करत आहे. मी कधी आखाड्यात कुस्ती केलेली नाही. त्यामुळे थोडा वेळ लागेल पण सध्या फिट राहणे यालाच सर्वात महत्व देत आहे.

पती पहिलवान सत्यव्रत याला चिखलात कुस्ती करण्याचा अनुभव आहे. तो भारत केसरी आहे. त्यामुळे कुस्ती संदर्भात तो अनेक टिप्स देतो ते लक्षात घेऊन सराव करते आहे.

Leave a Comment