रेड झोन मधून आलेल्या घोड्याला केले क्वारंटाइन

फोटो साभार नवभारत टाईम्स

जगभर फैलावलेल्या करोना महामारीमुळे जगभरात सर्वत्र भीती, दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येकजण सावधानता बाळगू लागले आहेत. छोटीशी चूक करोनाग्रास्तांचा आकडा वाढवू शकते हे लक्षात आल्याने आता सर्वतोपरी काळजी घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. दुसरीकडून माणसेच काय पण प्राणी आले तरी संबंधित गावाचे प्रशासन त्याचीही दाखल घेऊ लागले असल्याचा अनुभव जम्मू काश्मीर मध्ये नुकताच आला.

झाले असे की काश्मीरच्या राजौरी मध्ये एक माणूस त्याचा घोडा घेऊन आला. तो मुघल रोड, काश्मीर घाटीतून आला होता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी थांबविले तेव्हा तो रेड झोन मधून आल्याचे उघड झाले. लगोलग प्रशासनाला त्याची खबर दिली गेली. घोडे मालकाचे सँपल तपासणी साठी घेतले गेलेच पण पशुवैद्यकाला बोलावून घोड्याची तपासणी सुद्धा केली गेली. घोड्याला काही आजार नाही असे लक्षात आल्यावरही खबरदारी म्हणून घोड्याला १४ दिवस होम क्वारंटाइन करण्याचा आदेश दिला गेला.

त्यामुळे आता घोडा मालकाच्या कुटुंबातील कुणीही घोड्याला १४ दिवस भेटू शकणार नाही. देशात करोना संकट आल्यापासून प्राण्याला १४ दिवस क्वारंटाइन करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे समजते.

Leave a Comment