जयललितांची नक्की संपत्ती किती यावरून पेच

फोटो साभार एशियानेट न्यूज

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्युनंतर त्यांचे खरे कायदेशीर वारसदार कोण हे आता कायद्याने सिद्ध झाले आहे. मात्र जयललिता यांची नक्की संपत्ती किती यावरून आता वाद सुरु असून याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने द्यायचा आहे. या संदर्भात न्यायालयाकडे तीन वेगवेगळे आकडे सादर केले गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार जयललिता यांचे कायदेशीर वारसदार वारू दीपा आणि जे दीपक यांच्या म्हणण्यानुसार ही संपत्ती १८८ कोटींची आहे. तर एआयएडीएमकेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी ही संपत्ती ९१३.१३ कोटी असल्याचे म्हटले आहे. हे दोघे पदाधिकारी जयललिता यांच्या संपत्तीचे प्रशासक बनणार होते असेही समजते. अर्थात ही संपत्ती जयललिता यांनी १९९१ ते १९९६ या काळात मिळविलेली आहे.

जयललिता यांचे आवडते समर रिट्रीट आणि कोडनाड टी इस्टेट ही ९०० एकराची मालमत्ता जयललिता यांनी १९९२ मध्ये खरेदी केली होती त्याची किंमत बाजारात आता दुप्पट झाली आहे. टी इस्टेटचा आजचा बाजारभाव प्रती एकर १ कोटी रुपये असल्याचा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अश्या १७३ मालमत्ता आहेत ज्यातील किमान १०० मालमत्ता डीडस मध्ये जयललिता यांचे नाव आहे.

जयललिता यांची मैत्रीण आणि भागीदार शशिकला यांच्यामुळे जयललिता यांच्या कायदेशीर वारसदारांना या मालमत्ता वेगळ्या काढणे अवघड बनले आहे. सुप्रीम कोर्टाने शशिकला आणि जे इलवारसी, व्ही एन सुधागरण यांना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. १९९६ मधेच जयललिता यांच्या कडे सोने हिऱ्याचे साडे पाच कोटी रुपयांचे दागिने होते असेही समजते.

Leave a Comment