चिनी राष्ट्राध्यक्षांचा फुत्कार; सैन्यदलांना युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश


नवी दिल्ली – चीनमधील वुहानमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसमुळे जागतिक स्तरावर चीन गोची झाली असून त्यातच जगातील बहुतांश देश कोरोना संकटासाठी चीनला जबाबदार ठरवत आहेत. यामुळे चीनवर चहूबाजूंनी दबाव वाढत चालला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्या पार्श्वभूमीवर देशातील सैन्य दलाचे प्रशिक्षण अधिक बळकट करण्याचे व युद्धासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

जिनपिंग यांनी देशाची स्थिरता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी देशातील सैन्य दलाचे प्रशिक्षण अधिक बळकट करा व युद्धासाठी तयार राहा, असे निर्देश दिल्याचे वृत्त सरकारी माध्यमांनी दिले आहे. सध्या अमेरिका आणि भारताबरोबर चीनचा वाद सुरु आहे. चीनचे दोन्ही देशांसोबतचे संबंध ताणले गेले आहेत. सैन्यबळाचा वापर करुन तैवानचा जबरदस्तीने चीनमध्ये समावेश करण्याची मागणी स्थानिक पातळीवर होत आहे. त्याशिवाय हाँगकाँगमध्ये नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या तयारीमध्ये चीन आहे. यावर खूप कठोर प्रतिक्रिया उमटू शकते असा इशाराही अमेरिकेने चीनला दिला आहे.

एकूणच चीन या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणासमोर झुकणार नाही, हे दाखवून देण्यासाठी जिनपिंग यांनी थेट युद्धाची भाषा केली आहे. त्यातच चीन कोरोना व्हायरसच्या संकटामुळे एकाकी पडल्याचे चित्र आहे. कारण वुहान शहरातून कोरोना व्हायरसच्या साथीची सुरुवात झाली आणि हे सत्य दडपण्याचा प्रयत्न चीनने केल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक देश करत आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment