मोदींवर टीका करुन तोंडघशी पडले पाक परराष्ट्र मंत्री; ट्विट डिलीट करण्याची नामुष्की

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे स्वतःच्याच अंगलट आले आहे. कुरैशी पंतप्रधान मोदींवर कथित सर्वश्रेष्ठ हिंदूवादी विचारधारेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते मात्र ट्विटमध्ये त्यांच्याकडून चूक झाली. ट्विटरवर ट्रोल झाल्यानंतर कुरैशी यांना पोस्ट डिलीट करावी लागली.

कुरैशी म्हणाले की, आम्ही गप्प राहून आणखी एक गुजरात होऊ देणार नाही. मुस्लिम विरोधी हिंसा आणि इस्लामोबोफियाचे वाढते प्रकरण रोखण्यासाठी पाकिस्तानला इस्लामिक सहयोग संघटनेचे समर्थन मिळाले आहे. या विरुद्ध कारवाईसाठी पाकिस्तान ओआयसीसोबत मिळून एक समूह बनवला जाईल.

Image Credited – Moneycontrol

यानंतर कुरैशी यांनी आणखी एक ट्विट केले. मात्र त्यांच्या इतिहासाच्या ज्ञानावरच प्रश्न निर्माण झाले. त्यांनी ट्विट केले की, पाकिस्तान संयुक्त राष्ट्र आणि इस्लामिक सहयोग संघटनेला वारंवार आवाहन करत आहे की इस्लामोबोफियाच्या वाढत्या घटना, हिंसा व क्षेत्रीय अस्थिरते व्यतिरिक्त मोदींच्या द्रविडियन श्रेष्ठतेच्या विचारधारेची निंदा करावी. आम्ही यूएन प्रमुख अँटोनिया गुटरेज यांच्या इस्लामोफोबियाला काउंटर करण्याच्या योजनेचे स्वागत करतो.

Image Credited – oneindia

ट्विटमध्ये द्रविडियन शब्द वापरल्याने कुरैशी ट्रोल झाले. द्रविडियन शब्द सर्वसाधारणपणे दक्षिण भारत, दक्षिण-पुर्व आशिया आणि श्रीलंकेच्या संदर्भात वापरला जातो. तर उत्तर भारतीयांसाठी आर्य शब्द जोडला जातो. अमेरिकेचे पाकिस्तानातील माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी यावर ट्विट केले की पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना भारताच्या इतिहासाबद्दल थोडीही माहिती दिसत नाही. या ट्विटवरून कुरैशी ट्विटरवर ट्रोल झाले. ट्रोल झाल्यानंतर कुरैशी यांनी ट्विट डिलीट करून द्रविडियन शब्दा ऐवजी हिंदुत्व शब्द वापरला. मात्र तोपर्यंत त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.

Leave a Comment