लॉकडाऊनच्या काळात औरंगाबाद येथील एका भाजी विक्रेत्याने लावलेली पाटी लोकांचे लक्ष खेचून घेत आहे. या पाटीवर लिहिले आहे की शक्य असेल तर खरेदी करा, अन्यथा मोफत घेऊन जा. अनेक जण भाजी विक्रेत्याच्या या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत. या भाजी विक्रेत्याचे अडनाव लाबडे असून तो पदवीधर आहे. तो एका खाजगी कंपनीत काम करतो. मात्र लॉकडाऊनमध्ये अडचणीत असलेल्या लोकांना भाजी देऊन त्यांची मदत करत आहे.
महाराष्ट्रातील या भाजीवाल्याने लावली पाटी, ‘शक्य असेल तर खरेदी करा नाही तर मोफत घेऊन जा’

कंपनीने पगार देणे बंद केल्यानंतर त्याने वडिलांसोबत भाजी विकण्यास सुरूवात केली. सुरुवातीला इतरांप्रमाणेच बाजार किंमतीवर भाजी विकत असे, मात्र नंतर त्याने गरजूंना मोफत भाजी देण्याचा निर्णय घेतला.

त्याने सांगितले की, एक वृद्ध महिला 5 रुपये घेऊन भाजी खरेदी करण्यास आली होती. यानंतर मी त्यांना आवश्यक तेवढी भाजी मोफत दिली. तेव्हापासून गरजूंना मोफत भाजी देण्याचा निर्णय घेतला. मागील 3 दिवसांपासून 100 लोकांना मदत केली असून 2 हजार रुपयांची मोफत भाजी दिली आहे. आर्थिक स्थिती ठीकठाक आहे तोपर्यंत मी लोकांची मदत करेल. माझी ईच्छा आहे की कोणीही उपाशी झोपू नये.