किरण कुमार यांची कोरोनावर यशस्वी मात


बॉलिवूड अभिनेते किरण कुमार यांची कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची दुसरी कोरोना चाचणी देखील पॉझिटीव्ह आली. आता त्यांच्या तिसऱ्या चाचणीचे रिपोर्ट्स समोर आले असून त्यांची तिसरी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यानंतर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे.

मी माझा नेहमीचा चेकअप काही दिवसांपूर्वी करुन घेतला होता. माझ्या अनेक चाचण्या त्यावेळी झाल्या. त्यात कोरोना चाचणीचा देखील समावेश होता. तेव्हा माझ्यासोबत माझी मुलगी बसली होती आणि आम्ही मस्ती करत होतो. माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे कळताच आम्ही काही तासांमध्ये घराच्या एका मजल्याचे आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर केल्याचे त्यांनी म्हटले.

आम्ही घाबरु नये म्हणून हिंदुजा आणि लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी खूप मदत केली. याबाबत बीएमसीला आम्ही माहिती दिली. माझी कोरोना चाचणी आज करण्यात आली आणि ती निगेटीव्ह आल्याचे सांगताना मला आनंद होत आहे. पण माझे संपूर्ण कुटुंब अद्यापही आयसोलेशनमध्ये आहे. कोरोनाचे कोणतेही लक्षण मला जाणवत नसल्याचे, त्यांनी पुढे म्हटले आहे.

किरण कुमार यांनी कोरोनावर मात करण्यासाठी घरगुती उपचार म्हणून हळदीचा वापर केला होता. तसेच त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केल्यानंतर मेडीटेशन केले होते. वेब सीरिज पाहिल्या, पुस्तके वाचली होती. त्याचबरोबर आता किरण कुमार यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर सदस्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खचून न जाता सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला आहे. किरण कुमार यांच्या आधी कनिका कपूर, चित्रपट निर्माते करीम मोरानी, त्यांच्या दोन्ही मुली झोया आणि शाजिया यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. पण त्या सर्वांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

Leave a Comment