कोरोनामुळे जगभरातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने व कोरोनाच्या भितीने नागरिक दुसऱ्या देशात जाणे टाळत आहे. दरम्यान, जपानने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास पॅकेज जाहीर केले आहे. जपान सरकारने घोषणा केली आहे की पर्यटकांना बोलवण्यासाठी 18.2 बिलियन डॉलर खर्च करणार आहे. सरकारतर्फे पर्यटकांच्या प्रवासासाठी अर्धा खर्च केला जाईल.
या देशाला हवे पर्यटक, फिरायला गेल्यास सरकारच देणार पैसे

जपानच्या पर्यटन संस्थेचे प्रमुख हिरोशी तबाता म्हणाले की अर्धा खर्चा दिल्याने पर्यटक जपान फिरण्यासाठी आकर्षित होतील अशी आशा आहे. या योजनेची सविस्तर माहिती लवकरच जारी केली जाईल.

सरकारने नवीन योजना जुलैपर्यंत सुरू होईल असे म्हटले आहे. सध्या जपानमध्ये पर्यटकांवर बंदी आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशातील लॉकडाऊन हटवला आहे. जपानमध्ये आतापर्यंत 16 हजारांपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त सापडले आहेत.