भारत-चीन सीमा वादात मध्यस्थी करण्याची ट्रम्प यांची तयारी

भारत आणि चीनच्या सीमा वादाच्या पार्श्वभुमीवर आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले की, चीन आणि भारत दोन्ही देशांशी बोलणे झाले असून, दोन्ही देशातील सीमा वादावर अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे.

या महिन्याच्या सुरूवातीला लद्दाखमध्ये चीनी आणि भारतीय जवान एकमेंकाना भिडले होते. चीनकडून सीमेवर सैन्य संख्या वाढविण्याची आणि बेस बनवल्याची माहिती येत आहे. अशा परिस्थितीत भारतही पूर्णपणे तयार आहे.

Image Credited – The Hindu

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या सीमा वादाविषयी पंतप्रधान कार्यालयात चर्चा केली. तिन्ही सैन्य प्रमुखांना याविषयी पर्याय सुचवण्यास सांगितले आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सैन्य प्रमुख आणि सीडीएस उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले होते की भारत लद्दाख बॉर्डरवर आपल्या रस्ते निर्मितीचे काम थांबवणार नाही.

Leave a Comment