भारतीय ‘मित्रों’ची टीक-टॉकला तगडी टक्कर; लाखोंच्या संख्येत झाले डाऊनलोड

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकचे रेटिंग काही दिवसांपुर्वी युजर्सने खराब रिव्ह्यू देऊन कमी केले होते. या अ‍ॅपवर बंदी घालण्याची देखील युजर्सने केली होती. याच पार्श्वभुमीवर आता मित्रों (Mitron) नावाचे एक भारतीय अ‍ॅप टिकटॉकला टक्कर देत आहे. आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक वेळा हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. टीक-टॉक सारखेच फीचर्स मिळणाऱ्या या अ‍ॅपला आयआयटी रुडकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.

आयआयटी रुडकीचा विद्यार्थी शिवांक अग्रवालने तयार केले असून, हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर टॉप फ्री चार्टच्या टॉप-10 समावेश झाले आहे. पेटीएमचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक यांच्याद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हे अ‍ॅप दुसऱ्या स्थानावर दिसत आहे. या अ‍ॅपमध्ये टीक-टॉक व्यतिरिक्त दुसरे कोणतेही खास फीचर्स नाहीत. मात्र आपल्या नाव आणि ब्रँडिंगमुळे लोकप्रिय होत आहे.

Image Credited – Forbes

अ‍ॅप नवीन असून, यात अनेक बग्स आहेत. असे असले तरी याला चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. जवळपास 4.7 रेटिंग्स असणाऱ्या या अ‍ॅपमध्ये लॉग इन करताना समस्या येत असल्याचे अनेक युजर्सनी म्हटले आहे. मात्र भारतीय अ‍ॅप असल्याने भरपूर सपोर्ट मिळत आहे. 8 एमबीच्या या अ‍ॅपला 11 एप्रिल 2020 ला रिलीज करण्यात आले होते. सध्या केवळ गुगल प्लेवरच हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

Leave a Comment