घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुगल देणार 75 हजार रुपये भत्ता

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगभरात कर्मचारी घरून काम करत आहे. टेक कंपन्यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. मात्र आता लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यास सुरूवात केली आहे.

Image Credited – NBC News

गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून कामावर बोलविण्याची तयारी केली असून, 6 जुलैपासून वेगवेगळ्या शहरातील 10 टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालय उघडणार आहे. सर्व व्यस्थित असल्यास सप्टेंबरपासून 30 टक्के कर्मचारी कामावर येतील.

Image Credited – Bloomberg

खास गोष्ट म्हणजे घरून काम करणाऱ्या कंपन्यांना 1 हजार डॉलर अलाउंस (भत्ता) देणार आहे. म्हणजे भारतातील कर्मचाऱ्यांना 75 हजार रुपये मिळतील. फर्निचर, इतर आवश्यक वस्तूंसाठी कंपनी हा भत्ता देणार आहे.

Image Credited – indiatoday

कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, या वर्षी खूप कमी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवले जाईल. अधिकांश कर्मचारी घरून काम करतील. कामावर येणारे कर्मचारी रोटेशनल आधारावर काम करतील.

Leave a Comment