हाँगकाँगबाबत एका आठवड्यात मोठा निर्णय घेणार ट्रम्प

कोरोना व्हायरसमुळे चीनला जगभरातून टीकेचा सामना करावा लागत आहे. आता या संकटाच्या काळात चीनने हाँगकाँगवर वर्चस्व दाखविण्यासाठी नवीन कायदा आणला असून, चीनने याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे नाव दिले आहे. या कायद्यामुळे हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन होत असून, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील याविषयी भाष्य केले आहे.

Image Credited – The Boston Globe

ट्रम्प पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, हाँगकाँगमध्ये चीन जे करत आहे ते चुकीचे आहे. आम्ही लवकरच यावर निर्णय घेऊ. तुम्हाला या बाबत येणाऱ्या आठवड्यातच कळेल. आम्ही पॉवरफूल उत्तर देऊ.

Image Credited – Vox

चीनच्या संसदेमध्ये हाँगकाँग संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याविषयी चर्चा करण्यात आली व एका महिन्याच्या आत हा कायदा लागू केला जाईल असे सांगण्यात आले आहे. मागील वर्षी पासूनच हाँगकाँगच्या रस्त्यावर चीन प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू आहे. या कायद्यांतर्गत हाँगकाँगच्या एखाद्या व्यक्तीने चीनमध्ये गुन्हा केल्यास, त्याच्या चौकशीसाठी त्याचे प्रत्यर्पण केले जाईल. या आधी या विधेयकामध्ये ही तरतूद नव्हती. मात्र विधेयकात दुरुस्ती करत प्रत्यर्पणामध्ये तायवान, मकाऊ या देशांचा देखील समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ज्या गोष्टी प्रशासनाला देशद्रोही वाटतील असे काहीही केल्यास तीन वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते. हाँगकाँगमध्ये या कायद्याला लोकशाहीचे उल्लंघन म्हटले जात आहे.

Leave a Comment