चीनने पुन्हा मोजणी करण्यासाठी माउंट एव्हरेस्टवर पाठवली टीम

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी चीनची सर्वेक्षण टीमने तिबेटच्या मार्गाने एव्हरेस्टवर चढाई केली आहे. चीन नुसार माउंट एव्हरेस्टची उंची 8844.43 मीटर असून, नेपाळच्या आकड्यांपेक्षा हा आकडा 4 मीटरने कमी आहे. चीन आणि नेपाळमध्ये एव्हरेस्टच्या उंचीविषयी मतभेद असल्याने चीनने याची मोजणी सुरू केली होती. चढाई केल्यानंतर टीमच्या सदस्यांनी बर्फाच्या शिखरावर 20 स्केअर मीटर्समध्ये निशाण मारण्यास सुरूवात केली.

Image Credited – Twitter

चीनच्या सर्वेक्षणकर्त्यांनी  मोजपाम व वैज्ञानिक संशोधनासाठी सहावेळी चढाई केली होती व 1975 आणि 2005 अशा दोन्हीवेळी एव्हरेस्टची उंची जारी केली होती. ही उंची क्रमशः 8,848.13 मीटर आणि 8,844.43 मीटर होती.

Image Credited – Twitter

चीन आणि नेपाळने 1961 मध्ये माउंट एव्हरेस्टचा सीमाप्रश्न सोडवलेला आहे. नेपाळच्या तुलनेत चीनने आधिक पायाभूत सुविधा दिल्याने  अधिकांश गिर्यारोहक तिबेटच्या बाजूने एव्हरेस्टची चढाई करतात.

दरम्यान, चायनीज टेक कंपनी ह्युवाई चायना मोबाईलसोबत मिळून माउंट एव्हरेस्टवर दोन 5जी स्टेशन उभारण्याचे काम करत आहे.

Leave a Comment