आता आरोग्य सेतूमध्ये शोधा बग आणि मिळवा लाखो रुपये

कोरोना संक्रमण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप आरोग्य सेतूच्या प्रायव्हेसीवर सुरूवातीपासूनच प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक एथिकल हॅकर्सनी या अ‍ॅपच्या प्रायव्हेसीवर प्रश्न उपस्थित केले असले तरीही केवळ 41 दिवसांमध्ये 10 कोटींपेक्षा अधिक लोकांनी या अ‍ॅपला डाऊनलोड केले होते. अ‍ॅपच्या प्रायव्हेसीबाबत प्रश्न निर्माण झाल्यावर सरकारने पत्रकार परिषद घेऊन या अ‍ॅपचे अँड्राईड व्हर्जन ओपन सोर्स केल्याची माहिती दिली आहे.

सरकारने स्पष्ट केले की अ‍ॅपचे सोर्स कोड उपलब्ध करण्यात आले आहेत. ओपन सोर्स कोड उपलब्ध केल्याने जगातील कोणताही डेव्हलपर आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये कोणती माहिती स्टोर केली आहे व अ‍ॅप फोनमध्ये काय-काय करत आहे, हे जाणून घेऊ शकेल.

Image Credited – Amarujala

सरकारने अ‍ॅपमध्ये बग शोधण्यासाठी बग बाउंटी प्रोग्राम देखील लाँच केला आला. ज्याच्या अंतर्गत आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये बग शोधणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. सरकारने यासाठी सर्व डेव्हलपर्सचे स्वागत केले आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वीच फ्रान्सचा सिक्यूरिटी तज्ञ आणि एथिकल हॅकर इलियट अँडरसनने ट्विट करत आरोग्य सेतू अ‍ॅपच्या प्रायव्हेसीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. सरकारने अ‍ॅपचा सोर्स कोड पब्लिश करावा असे म्हटले होते.

Leave a Comment