ट्रूकॉलरच्या कोट्यावधी युजर्सचा डेटा डार्क वेबवर 75000 ला उपलब्ध ? कंपनीने दिले स्पष्टीकरण

ट्रूकॉलरच्या 4.75 कोटी भारतीय युजर्सचा डाटा डार्कवेबवर 75 हजार रुपयांना विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात ऑनलाईन इंटेलिजेंस कंपनी सायबलने माहिती दिली आहे. मात्र ट्रूकॉलरने या बाबत नकार दिला असून, आमच्या डाटाबेसमध्ये कोणताही ब्रीच झाला नसल्याचे म्हटले आहे.

Image credited – The Economic Times

हा डेटा 2019 चा असून, यामध्ये राज्य, शहर व भागांनुसार डेटा विभागलेला आहे. या डेटामध्ये युजर्सचा फोन नंबर, नाव, लिंग, ईमेल, फेसबुक आयडी आणि इतर खाजगी माहितीचा समावेश असल्याचे सायबलने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. यामुळे स्कॅम, फसवणूक होऊ शकते.

Image Credited – Hindustan Times

मात्र दुसरीकडे ट्रूकॉलर कंपनीने असा कुठलाच डेटा लीक झाला नसल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, आम्ही युजर्सची प्राव्हेसी आणि सर्व्हिसला गंभीरतने घेतो व अशा प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत असतो. मे 2019 मध्ये देखील आम्हाला अशा प्रकारच्या डेटा लीकची माहिती मिळाली होती. कदाचित हा तोच डेटाबेस आहे. कंपनीचे नाव वापरून हॅकर्सला डेटा विकण्यास सोपे जाते. कंपनीने युजर्सला या अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment