लग्झरी कार कंपनी मर्सिडिज बेंझने भारतात आपली नवीन कार मर्सिडिज एएमजी-सी63 कूप लाँच केली आहे. या लग्झरी कारची किंमत 1 कोटी 33 लाख रुपयांपासून सुरू आहे. भारतीय बाजारात नवीन मर्सिडिज-एएमजी सी63 कूप सी क्लासचे टॉप मॉडेल मिळेल. कंपनीने मर्सिडिज एएमजी जीटी आरचे अपडेटेड व्हर्जन देखील लाँच केले आहे. कोरोनामुळे दोन्ही कार्सला डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लाँच करण्यात आले.
कोट्यावधींच्या मर्सिडिज एएमजी सी 63 कूप, एएमजी जीटी आर भारतात दाखल
मर्सिडिज एएमजी-सी63 कूप –
कारच्या डिझाईन आणि कॉस्मेटिकमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. याच्या पुढील भागात एएमजी जीटीद्वारे घेण्यात आलेले पॅनअमेरिकाना ग्रिल देण्यात आले आहे.
मर्सिडिज एएमजी सी63 कूपमध्ये नवीन बग-आइड हेडलँप्ससोबत एलईडी डीआरएल, दमदार बोनेट आणि नवीन मोठ्या एअर इंटेक्ससोबत बंपर, 18-इंच एलॉय व्हिल्स, आकर्षक डिफ्यूजर आणि क्वा ट्रेपेजोडिअल एग्जहॉस्ट देण्यात आले आहे. जे कारला स्पोर्टी बनवते. कॅबिनमध्ये इंस्ट्रुमेंट आणि इंफोटेनमेंट डिस्प्ले सारखे मॉडर्न फीचर्स देण्यात आलेले आहे. कारमध्ये स्पोर्टी ब्लॅक आणि रेड लेदर रेस-स्टाइल बकेट सीट्स, फ्लॅट-बॉटम एएमटी स्टेअरिंग व्हिल, सेंट्रल कंसोलवर कार्बन फाइबर फिनिश सारखे फीचर्स मिळतील. ही कार स्लिपरी, कम्फर्ट, स्पोर्ट, स्पोर्ट प्लस, रेस आणि इंडिव्हिज्युअल सारखे 6 ड्राइव्हिंग मोड्स मिळतील.
मर्सिडिज एएमजी सी63 कूप सोबत बीएस-6 मानक 4.0 लीटर बाय-टर्बो व्ही8 इंजिन देण्यात आलेले आहे. हे दमदार इंजिन 469 बीएचपी पॉवर आणि 650 एनएम पीक टॉर्क नजरेट करते. कंपनीने यात स्पीडशिफ्ट 9 जी ट्रॉनिक ट्रांसमिशन दिले आहे. ही कार अवघ्या 4 सेंकदामध्ये ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते. या कारचा टॉप स्पीड ताशी 250 किमी आहे.
मर्सिडिज एएमजी जीटी आर –
मर्सिडिज एएमजी सी63 कूपसोबतच कंपनीने भारतात मर्सिडिज एएमजी जीटी आरचे अपडेटे व्हर्जन लाँच केले आहे. एएमजी जीटी आरची एक्स शोरूम किंमत 2.48 कोटी रुपये आहे. सध्या भारतीय बाजारात असलेल्या मर्सिडिज एएमजी जीटी आर व अपडेटेड मॉडेलमध्ये जास्त फरक नाही. कारमध्ये पुढील बाजूला अपडेटेड बंपर, 14 स्लेट व्हर्टिकल एप्रॉन, नवीन हेडलँप्स, एएमजी ए-टाइप पॅनअमेरिकाना ग्रील आणि ब्रेक कुलिंग मेझ्युरेस देण्यात आले आहे. मागील बाजूला देखील एअर कर्टिन्ससह मोठे बंपर, एक्झॉस्ट सिस्टम आणि ट्विक्ड कार्बन फायबर विंग मिळेल.
मर्सिडिज एएमजी जीटी आरमध्ये देखील मर्सिडिज एएमजी सी63 कूपचेच 4.0 लीटर बाय-टर्बो व्ही8 इंजिन येते. मात्र हे इंजिन 577 बीएचपी पॉवर आणि 700 एनएम टॉर्क देते. यात 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल. कार अवघ्या 3.6 सेंकदात ताशी 100 किमीचा वेग पकडू शकते व कारचा टॉप स्पीड ताशी 318 किमी आहे.