मंदिराचे खोदकाम करताना या देशात सापडले हजारो वर्ष जुने शिवलिंग

आग्नेय आशियातील देश व्हिएतनाममध्ये चौथ्या ते 13 व्या शतकातील बौद्ध आणि हिंदू धर्मासंबंधी अनेक कलाकृती आधी देखील सापडल्या आहेत. नुकतेच व्हिएतनाममध्ये वाळूच्या खडकाचे शिवलिंग खोदकामा दरम्यान सापडले आहे. हे शिवलिंग सापडल्याची माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरद्वारे दिली.

Image Credited – navbharattimes

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागने (एएसआय) एका संरक्षण परियोजनेचे खोदकाम करताना 9व्या शतकातील शिवलिंग सापडले आहे. हे शिवलिंग आजही व्यवस्थित स्थितीमध्ये आहे. हे शिवलिंग व्हिएतनामच्या माई सोन मंदिराचे खोदकाम करताना सापडले. जयशंकर यांनी सर्वेक्षण विभागाचे कौतुक करणारे ट्विट देखील केले.

जयशंकर यांनी खोदकामाचे फोटो शेअर करत आपल्या 2011 च्या या अभयारण्य प्रवासाच्या आठवणी देखील सांगितल्या. त्यांनी ट्विटमध्ये या शोधाला भारताच्या विकास भागीदारीला एक महान सांस्कृतिक उदाहरण म्हटले. या मंदिर परिसरात याआधी देखील मुर्ती आणि कलाकृती सापडल्या आहेत. ज्यात भगवान राम-सीता यांच्या लग्नाची कलाकृती आणि नकक्षीदार शिवलिंगचा समावेश आहे.

Image Credited – navbharattimes

व्हिएतनामच्या माई सोन मंदिरावर हिंदू प्रभाव आहे व येथे कृष्ण, विष्णू-शिव यांच्या मृर्त्या आहेत. मंदिराचे निर्माण चंपाच्या राजांनी चौथ्या ते 14 व्या शतकाच्या मध्ये केले होते.

Image Credited -navbharattimes

हे मंदिर मध्य व्हिएतनामच्या क्वांग प्रांतातील दुय फू गावात स्थित आहे. येथे स्थानिक समुदाय चमचे शासन देखील होते. चम समुदायातील अधिकांश लोक हिंदू होते, मात्र नंतर पुढे जाऊन त्यांनी बौद्ध व इस्लाम धर्म स्विकारला.

Leave a Comment