या सात चिन्यांना सोडता येणार नाही भारत

फोटो साभार लॉजिकल इंडियन

लडाख भागात तणाव निर्माण करणाऱ्या चीनने भारतात राहत असलेल्या भारतीयांनी देशात परत यावे यासाठी प्रयत्न सुरु केले असून चीनला परतण्याचे आवाहन चीनी राष्ट्रपती शी जीनपिंग यांनी चीनी नागरिकांना केले आहे. त्यासाठी नोंदणी करण्याची २७ मे ही तारीख जाहीर केली आहे मात्र असे असले तरी सात चीनी भारत सोडून जाऊ शकणार नसल्याचे दिल्ली गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जाहीर केले आहे.

या सात जणांवर दिल्ली पोलिसांनी न्यायालयात खटले दाखल केले असून त्यांचे पासपोर्ट आणि प्रवासासाठी लागणारी कागदपत्रे जप्त केली आहेत. हे सात लोक तब्लीगी जमातीशी संबंधित असून दिल्लीत झालेल्या निजामुद्दीन मरकज मौलाना साद कार्यक्रमात सहभागी झाले होते. अश्या ८३ परदेशी नागरिकांवर दिल्ली गुन्हा अन्वेषण विभागाने एका घटनेत अनेक आरोप ठेवले आहेत. ज्या परदेशी तब्लीगीना क्वारंटाइन केले गेले होते त्याचे पासपोर्ट जप्त केले गेले होते.

यात अमेरिकेचे ६, युकेचे ३, सौदीचे १०, फिलीपिन्सचे ६, चीनचे ७, ब्राझीलचे ८, अफगाणिस्तानचे ४, सुदानचे ६ व बाकी अन्य देशांचे आहेत. त्याचे विसा व अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे ते मायदेशी परतू शकत नाहीत. जोपर्यंत मुख्य आरोपी मौलाना साद दिल्ली पोलिसांच्या ताब्यात येत नाही तो पर्यंत या परदेशी नागरिकांना भारताबाहेर जाऊ दिले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमात एकूण २०४१ परदेशी नागरिक सामील झाले होते.

Leave a Comment