बॉलीवूड सुपरस्टारच्या या कन्या चमकल्या अन्य क्षेत्रात

फोटो साभार झी न्यूज

आपल्याकडे डॉक्टरची मुले डॉक्टर, राजकारण्यांची राजकारणी, कलाकारांची मुले कलाकार होण्याचे प्रमाण अधिक आहे. पण बॉलीवूड मध्ये सुपरस्टार असलेल्या काही कलाकारांच्या मुलीनी मात्र अभिनय क्षेत्रात न येताही स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.

एकता कपूर हे त्यातले एक ठळक नाव. जितेंद्र या सेलेब्रेटी कलाकाराची ही कन्या. तिने स्वतःची ओळख निर्माण केली ती ‘टीव्ही सिरीयल क्वीन’ अशी. वास्तविक तिने अनेक चित्रपट आणि वेबसिरीज बनविल्या आहेत पण तरी ती प्रसिद्ध आहे ती टीव्ही सिरीयल्स साठीच. डझनावारी हिट मालिका तिने दिल्या आहेत.

फोटो साभार वोग

बिगबी, बॉलीवूड शेहेनशाह आणि अभिनयाचा हिमालय अशी ओळख असलेले अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता आईवडील आणि भाऊ अभिनय क्षेत्रात असूनही बॉलीवूड मध्ये आली नाही. मात्र ती फेमस आहे तिच्या ‘एमएक्सएम’ या फॅशन ब्रांडमुळे. फॅशन डिझायनिंग बरोबर तिने रॅप वॉक केला आहे आणि पॅराडाइज टॉवर नावाचे पुस्तक लिहिले आहे. श्वेताचा फॅशन ब्रांड खास महिलांसाठी आहे.

फोटो साभार झी न्यूज

नुकतेच जगाचा निरोप घेतले ऋषी कपूर यांची कन्या रीधिमाही प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर असून ‘लेबल आर’ नावाने तिचा ज्वेलरी ब्रांड आहे. हृतिकची माजी पत्नी सुसेन ही जुने अभिनेते संजयखान यांची कन्या. तिचेही ‘द चारकोल’ नावाचे इंटिरीअर डिझायनिंग स्टोर्स आहे. तिचीच बहिण फराह ज्वेलरी फॅशन इंडस्ट्रीमध्ये आघाडीवर असून तिचा ‘एफके ज्वेलर्स’ हा स्वतःचा ब्रांड आहे. बॉलीवूड मधील अनेक बड्या तारका फराहची डिझाईन ज्वेलरी पसंत करतात.

Leave a Comment