दुसऱ्या महायुद्धाची साक्षीदार सुसरीचा मृत्यू

फोटो साभार नॉटसोकॉमन

अमेरिकेत जन्म, दुसऱ्या महायुद्धात बॉम्बिंग मध्येही मिळालेले जीवदान आणि रशियन मास्को झु मध्ये स्थलांतर असे जीवन वाट्याला आलेल्या एका सुसरीचा वयाच्या ८४ व्या वर्षी मृत्यू झाला. सॅटर्न असे या सुसरीचे नाव होते आणि असा प्रवाद आहे की जर्मनीचा तत्कालीन हुकुमशहा हिटलर याने ही सुसर पाळली होती. अर्थात याला ठोस पुरावा नाही मात्र तरीही थोडा काळ ही सुसर हिटलरच्या ताब्यात होती असे सांगितले जाते.

१९४३ मध्ये बर्लिनवर झालेल्या तुफानी बॉम्बफेकीत प्राणीसंग्रहालातातील जे मोजके प्राणी त्यातून वाचले त्यात सॅटर्नचा समावेश होता. विशेष म्हणजे सुसरीचे जे सरासरी आयुष्यमान आहे त्यात सॅटर्न अधिक काळ जिवंत राहिलेली सुसर आहे. बर्लिन मध्ये ती आकर्षणाचे केंद्र होती आणि त्यानंतर मास्कोच्या झु मध्ये तिचे स्थलांतर केले गेले. मास्को झुचे व्यवस्थापक सांगतात येथे अनेक वेळा तिने मृत्यूला हुलकावणी दिली होती. १९८० मध्ये एक कॉंक्रीट स्लॅब तिच्या अगदी जवळ पडली पण त्यातून ती वाचली. एका प्रेक्षकाने तिला दगड मारला त्यात ती जखमी झाली होती आणि अनेक महिने तिची ही जखम होती पण त्यातूनही ती वाचली.

१९३६ मध्ये अमेरिकेच्या मिसिसिपी जंगलात तिचा जन्म झाला होता. त्यानंतर तिला बर्लिनला पाठविले गेले. १९४३ च्या बॉम्बिंगनंतर ती तीन वर्षे गायब होती. एका ब्रिटीश सैनिकाला ती सापडली आणि त्यानंतर एका वरिष्ठ नाझीने तिला पाळले होते असे सांगितले जाते. सॅटर्न म्हणजे एक कथा होऊन राहिली होती आणि त्यामुळे तिच्या जाण्याचे दुख असल्याचे मास्को झुचे व्यवस्थापन सांगते.

Leave a Comment