करोना चॅरीटी गोल्फस्पर्धेत वुडस, मॅनिंगला १५२ कोटीचे बक्षीस

फोटो साभार भास्कर

करोना चॅरीटी साठी खेळल्या गेलेल्या गोल्फ स्पर्धेत अमेरिकेचा जगविख्यात गोल्फपटू टायगर वूड्स आणि पेटन मॅनिंग ही जोडी सहभागी झाली होती. त्यांनी फील मिकेलसन आणि टॉम ब्रँडी या जोडीला हरवून २० मिलियन डॉलर्स म्हणजे १५२ कोटी रुपयाचे बक्षीस जिंकले असून हे पैसे करोना रिलीफ फंड मध्ये दिले जात आहेत.

करोनामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धा गेले दोन महिने बंद आहेत. विम्बल्डन टेनिस ग्रांड स्लॅम स्पर्धा रद्द झाली तर आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली. टोक्यो ऑलिम्पिक १ वर्षासाठी पुढे ढकलली गेली आहे.

करोना चॅरीटी गोल्फ स्पर्धेत नॅशनल फुटबॉल लीग खेळाडू मॅनिंग याने शॉट ऑफ द डे मारला तर वूड्स आणि मॅनिंग यांनी ही स्पर्धा एक शॉटच्या अंतराने जिंकली. वूड्सने फेब्रुवारी मध्ये शेवटचे गोल्फ खेळले होते आणि त्यानंतर पाठीच्या दुखण्यामुळे अनेक स्पर्धातून माघार घेतली होती.

Leave a Comment